March 7, 2026

अकोलेत अवैध उत्खननावर घाव; महसूल विभागाची आजवरची सर्वात मोठी कारवाई

jg

अकोले तालुक्यातून वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोले महसूल विभागाने अवैध अकोले तालुक्यातून वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोले महसूल विभागाने अवैध उत्खनन व नियमभंग करणाऱ्या माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 21 स्टोन क्रशर आणि खानपट्टे सील केले आहेत. या एकाचवेळी झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे अवैध धंद्यांवर मोठा आघात झाला असून, ही कारवाई अकोले महसूल विभागाच्या इतिहासातील मैलाचा दगड मानली जात आहे.

या ठिकाणी व संबंधितांवर कारवाई

महसूल विभागाकडून खालील ठिकाणी स्टोन क्रशर व खानपट्ट्यांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे:

  • विरगाव – अमोल नाईकवाडी
  • देवठाण – शिवाजी बोडके
  • राजूर – सुनील पवार, राजेंद्र भडांगे
  • सुगाव – किसन आरोटे
  • खानापूर – गोकुळ राजिस्तारोटे
  • बेलापूर – सोपनिल फापाळे
  • वाकी – दत्तू सगवण
  • पोपेडवाडी – गोविंद सदगीर
  • धुमाळवाडी – नितीन नाईकवाडी, सुनिता बालासाहेब धुमाळ
  • कोंभाळणे – सचिन सदगीर, किसन सदगीर
  • मूथाळणे – सुमन पाडेकर, बबन सदगीर
  • जामगाव – धनराज बाळासाहेब आरोटे
  • अगस्तीनगर – विशाल शेणकर 
  • रुंभोडी – रोहिणी गोरक्ष मालुंकर
  • राजूर – अंजली त्रिंबककर, नितीन पंढरीनाथ मुर्तडक
  • वाशरे – शरद मनोहर रत्नपारखे 

वरील सर्व 21 ठिकाणचे स्टोन क्रशर व खानपट्टे सील करण्यात आले आहेत.

इटीएस मंजुरी नसल्याने कडक कारवाई

चालू आर्थिक वर्षात अकोले तालुक्याला महसूल वसुलीचे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार, स्टोन क्रशर व खानपट्टेधारकांना EIA / ETS मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र तालुक्यात केवळ काही मोजक्या व्यावसायिकांनीच ही मंजुरी घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला.

योग्य मंजुरीशिवाय सुरू असलेले उत्खनन, शासनाच्या तिजोरीत रॉयल्टी न भरता सुरू असलेले व्यवहार आणि नियमांचे उल्लंघन यामुळे संबंधितांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

वाळू उत्खननावरही महसूलची नजर

याच पार्श्वभूमीवर, 21 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रवरा नदी पात्रात ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार मंडळ अधिकारी अकोले व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित वाहन जप्त केले असून पंचनामा करून 47-47 कलमान्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

तसेच बाबराव वाक्तोरे यांच्या शेतामध्ये तीन ते चार ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून त्यावरही पंचनामा करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

“यापुढे कुणालाही माफी नाही” – महसूल विभागाचा इशारा

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून दररोज तपासणी आणि शोध मोहीम राबवली जात आहे.

महसूल विभागाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,
“यापुढे अवैध उत्खनन, नियमभंग आणि महसूल बुडवणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही.”

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात आलेली ही 21 ठिकाणची कारवाई अकोले महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरत असून, येत्या काळात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..