March 7, 2026

उद्या अकोले कडकडीत बंद : रेल्वे अकोलेमधून गेलीच पाहिजे या मागणीसाठी व्यापारी वर्गाचा पाठिं

Screenshot 2025-12-15 165314

अकोले तालुक्यातून नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग जावाच, या ठाम मागणीसाठी उद्या अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदला अकोलेतील सर्व व्यापारी वर्गाने जाहीर पाठिंबा दिला असून, तालुक्याच्या विकासासाठी एकजुटीचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रस्तावित हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून गेल्यास व्यापार, उद्योग, पर्यटन, शेती व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मात्र, अकोलेला पुन्हा एकदा डावलले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अकोले व्यापारी संघटना, दुकानदार, बाजार समितीतील व्यापारी तसेच विविध व्यावसायिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

या आंदोलनाला शेतकरी, युवक, सामाजिक संघटना आणि विविध समाजघटकांनीही पाठिंबा दर्शविला असून, “रेल्वे अकोलेमधून गेलीच पाहिजे” या एकाच मागणीसाठी संपूर्ण तालुका एकवटला आहे.

अकोलेकरांचा हा बंद शांततेच्या मार्गाने पार पडणार असून, प्रशासनाने जनतेच्या भावनांचा आदर करून अकोलेच्या हक्काची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..