महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार किरण लहामटे यांचे बाबासाहेब यांच्या पुळत्याला अभिवादन
अकोले │ आज ६ डिसेंबर – महापरिनिर्वाण दिन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोले तालुक्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आमदार किरण लहामटे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
महात्मा फुले चौकात झालेल्या या कार्यक्रमात आमदार लहामटे यांनी पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची आठवण करून दिली.
त्यांनी सांगितले—
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार हेच समाजाला योग्य दिशेने नेणारे प्रकाशस्तंभ आहेत.”
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक बांधव, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोले तालुक्यातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रम, अभिवादन उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची शपथ घेण्याचे उपक्रम दिवसभर सुरू राहणार आहेत.
➡️ अधिक स्थानिक अपडेट्ससाठी NewsAkole सोबत राहा!
