March 7, 2026

अकोलेतील ऐतिहासिक आमसभेतील प्रश्नांवर पाठपुरावा सभा संपन्न

601489588_1496570885809912_8837233645849377476_n

अकोले | प्रतिनिधी

दिनांक १० ऑक्टोबर रोजी अकोले तालुक्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक आमसभा पार पडली होती. या आमसभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आज अकोले पंचायत समितीच्या सभागृहात विशेष पाठपुरावा सभा आयोजित करण्यात आली.

या बैठकीत आमसभेत विचारलेल्या सर्व प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सोडवणूक व सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर थेट अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली.

यावेळी आमदार किरण लहामटे यांनी स्वतः सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेतला व प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर कार्यवाही होत असल्याने ही आमसभा व पाठपुरावा सभा लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..