March 7, 2026

अकोले नगरपंचायतीतर्फे ‘कचऱ्यातून समृद्धीकडे – Waste to Wealth स्पर्धा २०२६’चे आयोजन

aasasa

अकोले | प्रतिनिधी

अकोले नगरपंचायत, अकोले (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने ‘कचऱ्यातून समृद्धीकडे (Waste to Wealth) स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत राबविण्यात येणारी ही स्पर्धा अकोलेकरांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

या स्पर्धेत टाकाऊ कचऱ्यापासून उपयोगी, नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक वस्तू तयार करून सहभागी नागरिकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

🔹 स्पर्धेचे गट

स्पर्धा खालील तीन गटांत होणार आहे –

  • गट अ : शालेय विद्यार्थी (५ वी ते १० वी)
  • गट ब : महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक
  • गट क : खुला गट (महिला बचत गट, उद्योजक व नागरिक)

🔹 स्पर्धेचे नियम

  • तयार करण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये किमान ८०% टाकाऊ साहित्याचा वापर अनिवार्य
  • वस्तू उपयुक्त (Functional) आणि स्वतः तयार केलेली असावी
  • तयार वस्तूचे २ फोटो व १ व्हिडिओ WhatsApp वर पाठवणे आवश्यक

🔹 बक्षिसे व मूल्यांकन

प्रत्येक गटासाठी आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहेत. वस्तूंचे मूल्यांकन उपयोगिता, पर्यावरणपूरकता व नाविन्य या निकषांवर करण्यात येईल.

🔹 महत्त्वाच्या तारखा

  • स्पर्धा कालावधी : ०१ फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६
  • प्रदर्शन : १२ फेब्रुवारी २०२६ (उत्कृष्ट ६० वस्तूंचे प्रदर्शन)
  • निकाल जाहीर : १३ फेब्रुवारी २०२६ दुपारी १२.०० वाजता

🔹 संपर्क

स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी व माहिती पाठवण्यासाठी WhatsApp क्रमांक –
📱 9420638435 | 9890134579 | 8830892352

अकोले नगरपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा स्वच्छ अकोले, हरित अकोले व समृद्ध अकोले या संकल्पनेला चालना देणारी ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..