March 7, 2026

अकोले येथे २२ फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

b40a0b47-5370-4270-98ec-40d13d45844

    अकोले शहरात विधी सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य “विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा” आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम National Legal Services Authority, Maharashtra State Legal Services Authority यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच District Legal Services Authority Ahmednagar यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.

तालुका स्तरावर हा कार्यक्रम Taluka Legal Services Committee Akole यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे स्थळ : 

   हा महामेळावा रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेतअकोले येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम स्थळ: आयटीआय ग्राऊंड , कोल्हार घोटी  रोड, अकोले.

यात काय मिळणार नागरिकांना?

    या महाशिबिरात विधी सेवा प्राधिकरण, राज्य शासन, जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी मार्गदर्शन व लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांना आवाहन :

Ahmednagar जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मोफत कायदेशीर सल्ला, शासकीय योजनांची माहिती आणि विविध विभागांचे स्टॉल्स यामुळे हा महामेळावा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.

न्यूज अकोले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..