जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अकोलेकर एकत्र येणार

अकोले न्यूज
काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निरपराध पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज संध्याकाळी ७:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक, अकोले येथे सर्व अकोलेकर नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक भारतीय नागरिक आणि अकोले ग्रामस्थ म्हणून, आपली एकजूट आणि संवेदनशीलता दाखवण्यासाठी प्रत्येकाने एका मेणबत्ती सह या श्रद्धांजली सभेमध्ये सहभागी व्हावे, ही नम्र विनंती आहे.
या कार्यक्रमाद्वारे आपण केवळ मृत पर्यटकांप्रती श्रद्धा व्यक्त करणार नाही, तर दहशतवादाविरोधात आपला कडवट निषेधही नोंदवणार आहोत.
स्थान: छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक, अकोले
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
अनुरोध: प्रत्येकाने एक मेणबत्ती घेऊन यावे
दहशतवादाचा निषेध करुया, शांततेचा संदेश पसरवूया!
