March 7, 2026

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे अकोलेत आदिवासी महिलेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप

e14d6366-1e06-4676-8da1-28803750c40

अकोले तालुक्यातील आदिवासी भिल समाजातील तरुणी कै. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. अकोले तालुका) हिला दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी बाळंतपणासाठी अकोले येथील डॉ. डावरे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बाळंतपणादरम्यान करण्यात आलेल्या चुकीच्या सिझर शस्त्रक्रिया व निष्काळजी औषधोपचारामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईक व आदिवासी संघटनांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार न करता निष्काळजीपणा केल्याचे तसेच मृत्यूनंतरही घटनेची बनवाबनवी करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोले तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

या गंभीर प्रकरणात डॉ. डावरे, डॉ. घनकुटे आणि डॉ. देविदास नवले हे दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळू नये, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ विद्रोही आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

सदर घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील उपचार पद्धती, डॉक्टरांची जबाबदारी व आरोग्य यंत्रणेवरील नियंत्रण याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..