वनहक्क दावे अंतिम करण्यासाठी राजूर येथे आढावा बैठक

0
सककस

आमदार किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली वनहक्क दाव्यांचा आढावा

राजूर, अकोले : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांची तपासणी करून दावेदारांना वनहक्क प्रदान करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कालबद्ध वनहक्क अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कार्यालय, राजूर येथे वनपट्टेधारकांच्या वनहक्क दाव्यांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पात्र वनहक्क दावे अंतिम करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

वनहक्क दाव्यांची विहित प्रक्रियेनुसार तपासणी पूर्ण करून पात्र दावेदारांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे, गटविकास अधिकारी अमर माने तसेच वन विभागाचे पडवळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वनहक्क कायद्यांतर्गत वैयक्तिक तसेच सामूहिक दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

NewsAkole | अकोले
वाचा, पहा आणि अपडेटेड रहा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

न्यूज अकोले App
न्यूज अकोले Mobile App
ताज्या बातम्यांसाठी App डाउनलोड करा
Download App
ADVERT
Left Animation GIF Play Store Badge

NewsAkole App

डाउनलोड करा आणि मिळवा सर्व न्यूज अपडेट्स तुमच्या मोबाईलवर

ADVERT
NewsAkole App Feature Play Store Badge

Order Food Online

आता आपल्या अकोले शहरात देखील FoodOrderKar Food Delivery App Available On Play Store