IPL 2025 रणसंग्राम : KKR विरुद्ध RCB यांच्यात आज पहिली मॅच!

IPL 2025 रणसंग्राम शनिवार, २२ मार्च २०२५ | वेळ: संध्याकाळी ७:३० वा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या धमाकेदार हंगामाची सुरुवात आज होणार आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात जोरदार लढत होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
IPL 2025 रणसंग्राम: दोन्ही संघांच्या तयारीवर लक्ष:
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
या हंगामात KKR संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहेत. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली संघाने तयारी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
RCB संघाचे नेतृत्व यंदा रजत पाटीदार करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने नवा उत्साह आणि ऊर्जा दाखवली आहे.
या सामन्यातील प्रमुख आकर्षणे :
या सामन्यात प्रमुख आकाशाने हि भारताचा स्टार फलंदाज कोहली आणि आंद्रे रसेल असेल, विराट कोहली आणि आंद्रे रसेल यांच्याकडून प्रेक्षकांना तडाखेबाज खेळीची अपेक्षा आहे. तसेच सुनील नारायण आणि मोहम्मद सिराज यांच्यातील गोलंदाजीची लढतही उत्सुकतेचा विषय आहे.
खेळपट्टीचा अंदाज:
ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, ज्यामुळे उच्च धावसंख्या होण्याची शक्यता आहे. मागील सामन्यांमध्ये येथे सरासरी धावसंख्या सुमारे १८० धावा होती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३८ सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ५५ सामने जिंकले आहेत, ज्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकतो.
दोन्ही संघांच्या आकांक्षा
कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अजूनही त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. नवीन कर्णधार आणि संतुलित संघासह, RCB या हंगामात त्यांच्या पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.
ईडन गार्डन्सवर होईल सामना :
हा सामना ईडन गार्डन्स वर खेळवला जाणार आहे या संयासाठी स्टेडियमवर आज प्रेक्षकांच्या गर्दीने चांगलीच उसळणार आहे. ६५,००० प्रेक्षक या सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहतील.
प्रसारण आणि लाइव्ह स्ट्रीमिंग:
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, जिओ सिनेमा अॅप आणि हॉटस्टारवर देखील सामना थेट पाहता येईल.
🏏 IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. अधिक अपडेट्ससाठी वाचत राहा – NewsAkole.com! ✅