रोज किती पाणी प्यावे? त्याचे फायदे आणि तोटे

रोज किती पाणी प्यावे? आपल्याला माहिती आहे पाणी हे जीवनाचा आधार आहे. आपल्या शरीराचे सुमारे ६०-७०% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरातील सर्व अवयवांच्या योग्य कार्यासाठी पाणी आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डीहायड्रेशन (Dehydration) होऊ शकते, तर जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी पिण्याचे योग्य प्रमाण माहित असणे गरजेचे आहे. आज आपण येथे पाणी किती प्यावे त्याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत…
रोज किती पाणी प्यावे?
रोज किती पाणी प्यायचे हे वय, लिंग, शरीराचे वजन, शारीरिक सक्रियता आणि हवामानावर अवलंबून असते. तज्ज्ञांच्या मते, सामान्यतः खालीलप्रमाणे पाणी पिणे योग्य मानले जाते:
- पुरुष: दिवसाला साधारणतः ३.५ – ४ लिटर पाणी पिणे योग्य आहे.
- महिला: दिवसाला साधारणतः २.५ – ३ लिटर पाणी आवश्यक आहे.
- मुलं (4-8 वर्षे): दिवसाला १.५ – २ लिटर पाणी प्यावे.
- किशोरवयीन मुले (9-18 वर्षे): दिवसाला २.५ – ३ लिटर पाणी आवश्यक.
- गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला: अधिक प्रमाणात पाणी (३-३.५ लिटर) पिण्याची गरज असते.
- शारीरिक श्रम करणारे किंवा खेळाडू: त्यांना अधिक घाम येत असल्याने ४-५ लिटर पाणी आवश्यक असते.
टीप: गरम हवामानात, उन्हाळ्यात किंवा व्यायाम करताना पाण्याचे प्रमाण अधिक असावे.
पाणी पिण्याचे १० आरोग्यदायी फायदे:
- शरीर हायड्रेट ठेवते: शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहिल्याने थकवा, चक्कर येणे टाळता येते.
- पचन सुधारते: पाणी पचनसंस्था सुरळीत ठेवते. नियमित पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
- त्वचेसाठी उपयुक्त: भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
- वजन कमी होण्यासाठी मदत: पाणी पिल्याने भूक कमी होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन जास्त असेल आणि तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर जेवणाअगोदर पाणी प्या . पाणी पिल्याने पोट भरल्यागत होते आणि ओव्हर इटिंग होत नाही त्यामुळे वजन आटोक्यात येण्यास मदत होते.
- ऊर्जा वाढवते: शरीर हायड्रेट राहिल्याने थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते.
- किडनीच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त: भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रमार्ग संक्रमण (UTI) टाळता येते आणि किडनी निरोगी राहते.
- डिटॉक्सिफिकेशन: शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी मदत करते.
- सांध्याचे आरोग्य राखते: सांध्यांमध्ये आवश्यक प्रमाणात लुब्रिकेशन राहते.
- रक्तदाब संतुलित राहतो: योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो.
- ताप कमी करण्यास मदत: पाण्याच्या सेवनामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते.
जास्त पाणी प्यायल्याचे तोटे:
आताच आपण पाण्याचे फायदे पहिले पण म्हणतात नाही का कोणत्याही गोष्टीचा अतिकार वाईट असतो अगदी तेच पाणी प्रमाणाबाहेर घेतले तर वाएत परिणाम होतात. काही लोक अधिक प्रमाणात पाणी पितात, परंतु यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात चला पाहूयात कोणते ते :
- हायपोनेट्रेमिया (Hyponatremia): जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमची पातळी कमी होते. यामुळे उलटी, थकवा आणि भ्रम निर्माण होतो.
- किडनीवर ताण: सतत जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येतो आणि त्याचे कार्य प्रभावित होऊ शकते.
- पचन समस्या: अधिक पाणी प्यायल्याने पचनसंस्था बिघडू शकते, पोट फुगणे किंवा अपचन होऊ शकते.
- वारंवार लघवी होणे: जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवी लागते, यामुळे झोपेत अडथळा येतो.
- पोट फुगणे आणि अस्वस्थता: एकावेळी खूप पाणी प्यायल्याने पोट फुगते आणि अस्वस्थ वाटते.
पाणी पिण्याचे योग्य वेळ:
- सकाळी उठल्यावर: १-२ ग्लास कोमट पाणी प्यावे.
- जेवणाच्या ३० मिनिटे आधी: पाणी प्यायल्याने पचन सुधारते.
- व्यायाम करताना: घामाच्या प्रमाणानुसार पाणी प्यावे.
- झोपण्यापूर्वी: १ ग्लास पाणी प्यावे, मात्र अति प्रमाण टाळावे.
टीप: जेवणाच्या वेळी आणि लगेच पाणी पिणे टाळावे. यामुळे पचनक्रिया प्रभावित होऊ शकते.
पाणी पिण्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स:
- रोजची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी फळांचा रस, सूप, नारळपाणी यांचा समावेश करा.
- फळे आणि भाज्यांमध्येही पाण्याचे प्रमाण असते.
- उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि शरीराला डिहायड्रेशन होण्यापासून वाचवा.
- लघवीचा रंग हलकासा पिवळसर असेल, तर पाण्याचे प्रमाण योग्य आहे. गडद पिवळा रंग असल्यास पाणी कमी पित आहात, याची जाणीव होते.
अशाच आरोग्यास हितकारक पोस्ट्स वाचण्यासाठी न्यूज अकोले ला सबस्क्राईब करा.