अकोले शहरात वाहतुकीचा बेशिस्त कारभार – नागरिकांचा संताप

अकोले शहरात वाहतुकीचा बेशिस्त कारभार – नागरिकांचा संताप

अकोले शहरात वाहतुकीचा बेशिस्त कारभार…

अकोले: अकोले शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा शिस्तप्रियतेचा अभाव वाढताना दिसत आहे. रस्त्यावर अस्तव्यस्त पार्किंग आणि रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून गप्पा मारण्याच्या सवयीमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या बेशिस्त वर्तनामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. होय आपले शहर लहान आहे पण त्यामुळे बेशिस्त असावे असे नाही ना ! हळू हळू आपल्या शहरातील रस्ते चांगले होत आहेत आनंदाची गोष्ट आहे पण आपल्यातही शिस्त यायला हवी ना !


अकोले शहरात वाहतुकीचा बेशिस्त कारभार, अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर वाहनचालक आपली वाहने नियमबाह्यपणे उभी करतात.

  • काही वाहनचालक रस्त्याच्या मधोमधच गाडी थांबवून गप्पा मारतात, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होतो.
  • रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
  • विशेषतः बाजाराच्या गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा संपूर्ण खोळंबा होतो.

गुंडगिरीचा प्रत्यय – रस्त्याला वडिलांची मालमत्ता समजणारे प्रवृत्ती:

अनेकदा काही वाहनचालक रस्त्याने कुणी ओळखीचा भेटला कि वाहन रस्त्याच्या बाजूला लावून गप्पा न मारता रस्त्यातच गप्पा मारणे सुरु करतात परिणामी मागून येणाऱ्या वाहनास त्या मध्ये उभ्या असलेल्या वाहनास ओवर टेक करून आपली वाहणे पुढे घ्यावी लागतात यामुळे अपघात देखील होतात… त्यांना जर कोणी गाडी बाजूला घ्या म्हणाले उद्धटपणे बोलतात. “गाडी तुमच्या बापाची आहे हो, पण रस्ता सर्वांच्या बापाचा आहे” याचा विसर पडल्यासारखे हे लोक वागतात.

  • रस्त्यावर मनमानीपणे गाड्या उभ्या करून वाहतूक रोखतात.
  • त्यावरून नागरिकांनी जर काही बोलले तर त्यांना उद्धटपणाने उत्तर देतात.
  • ही गुंडगिरीची वृत्ती आणि बेशिस्त वर्तन नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.

वाहतूक पोलिसांचा ढिसाळ कारभार:

वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात सातत्याचा अभाव दिसून येतो.

  • चुकीच्या पार्किंगवर दंड आकारला जात नसल्यामुळे वाहनचालक बिनधास्त गाड्या कुठेही उभ्या करतात.
  • बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई न झाल्याने शिस्तभंग अधिकच वाढतो आहे.

नागरिकांनी वाहतूक शिस्त पाळण्याची गरज:

वाहतुकीतील वाढत्या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळण्याची गरज आहे.

  • योग्य पार्किंग: वाहन निश्चित जागेवरच पार्क करा.
  • वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा: रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून गप्पा मारणे टाळा.
  • वाहतूक नियम पाळा: वाहतूक पोलिसांनी कारवाईची भीती न ठेवता स्व-प्रेरणेने वाहतूक नियमांचे पालन करावे.

प्रशासनाने कठोर कारवाईची गरज :

  • नगरपंचायत ने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.
  • वाहतूक पोलिसांनी सतत गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंड लावावा.
  • मुख्य चौकांवर सीसीटीव्ही बसवून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.

सामान्य नागरिकांचा आक्रोश

वाहतुकीतील बेशिस्त वर्तनामुळे अकोलेकर हैराण झाले असून, प्रशासनाने या संदर्भात त्वरित पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. “रस्त्यावर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई झाली तरच अकोले शहरातील वाहतूक शिस्तीत येईल,” असे नागरिकांचे मत आहे.

अकोले तालुक्यास ग्रेट अकोले बनविण्यासाठी न्यूज अकोले ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *