July 14, 2026

अकोलेत युरिया खतासाठी झुंबड; शेतकऱ्यांची मोठी गर्दी, तासन्‌तास प्रतीक्षा

Screenshot2026-07-1411332

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यात खरीप हंगाम जोरात सुरू असताना युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आज अकोले येथील खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. युरिया खत मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले, तर काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सध्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मका, भात, सोयाबीन, बाजरी तसेच इतर खरीप पिकांसाठी युरिया खताची गरज वाढली आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच खत विक्री केंद्रांवर दाखल झाले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली.

शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच खत वितरण प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध करून शेतकऱ्यांना विनाकारण ताटकळत उभे राहावे लागू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी खताचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..