June 25, 2026

अकोले शहरात घरफोडी; सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज लंपास

AAS

अकोले | प्रतिनिधी 

अकोले शहरातील सिडफार्म परिसरात राहणारे राजेंद्र अकले यांच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड असा एकूण अंदाजे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र अकले हे दशक्रिया विधीसाठी राजूर येथे मुक्कामी गेले होते. यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश केला. घरातील कपाटे व इतर सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तात्काळ अकोले पोलिसांना माहिती देण्यात आली.

या प्रकरणी Akole Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अकोले शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा घटनांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *