August 4, 2026

अकोलेतील १० हजारांहून अधिक पात्र नागरिकांना रेशन मिळावे; इष्टांक वाढविण्याची आमदार डॉ. किरण लहामटे यांची मागणी

762780166_4530184160593890_7926622859528958867_n

अकोले : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील रेशनचा इष्टांक तातडीने वाढविण्याची मागणी केली.

यावेळी अकोले तालुक्यातील सुमारे १० हजारांहून अधिक पात्र नागरिक आजही रेशन योजनेपासून वंचित असल्याची गंभीर बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. गरजू व पात्र लाभार्थ्यांना त्वरित रेशनचा लाभ मिळावा तसेच तालुक्याचा रेशन इष्टांक वाढवून मंजूर करण्यात यावा, अशी ठाम भूमिका आमदार लहामटे यांनी मांडली.

या मागणीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरावर अकोले तालुक्याचा इष्टांक वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार लहामटे यांनी दिली.

याशिवाय राज्यातील रेशन वितरण व्यवस्थेमध्ये वाढत चाललेल्या कथित गैरव्यवहार व घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार लहामटे यांनी मंत्री महोदयांकडे केली.

अकोले तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि कोणताही गरजू नागरिक अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..