अकोलेच्या प्रतीक्षा म्हस्के यांना फार्मसी विषयात पीएचडी पदवी
मोनाड युनिव्हर्सिटीतून मिळवली डॉक्टरेट; ‘हर्बल रेमिडीज इन डायबेटिक नेफ्रोपॅथी सिस्टम’ विषयावर संशोधन
अकोले : मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका प्रतीक्षा म्हस्के तथा प्रतीक्षा अक्षय रहाणे यांनी फार्मसी विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. मोनाड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ही पदवी संपादन केली.
डॉ. गरिमा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक्षा म्हस्के यांनी ‘हर्बल रेमिडीज इन डायबेटिक नेफ्रोपॅथी सिस्टम’ या विषयावर संशोधन केले. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या किडनीशी संबंधित गुंतागुंतीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हर्बल उपचारपद्धतींच्या संभाव्य उपयोगाचा अभ्यास त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होता.
प्रतीक्षा म्हस्के यांच्या या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील यशाबद्दल आनंदगड शैक्षणिक संकुलातील मान्यवर, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे अकोलेच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंद व्यक्त होत आहे.
NewsAkole | अकोले
वाचा, पहा आणि अपडेटेड रहा.
