दीड तास बसची प्रतीक्षा; आगार प्रमुखांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना वॉचमनकडून धक्काबुक्की

0
oak-100kb

संगमनेर आगारातील प्रकार; छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून जाहीर निषेध, संबंधित वॉचमनवर कारवाईची मागणी

संगमनेर : बससेवा उशिरा होत असल्याच्या समस्येबाबत आगार प्रमुखांची भेट घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांशी संगमनेर आगाराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वॉचमनने अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, छात्रभारती विद्यार्थी संघटनेने या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बस तब्बल दीड तास उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या समस्येबाबत आगार प्रमुखांची भेट घेऊन आपली अडचण मांडण्यासाठी काही विद्यार्थी संगमनेर आगारात गेले होते. मात्र, आगाराच्या गेटवर तैनात असलेल्या वॉचमनने विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे.

यावेळी संबंधित वॉचमनने विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली तसेच, “आगार व्यवस्थापन माझ्या नावावर आहे, तुमचं काही चालणार नाही,” अशा स्वरूपाची भाषा केल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या बससेवेच्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्याशी अशा प्रकारची वर्तणूक करणे गंभीर असल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.

आगार व्यवस्थापनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

संगमनेर आगारातून बससेवा वारंवार उशिरा होत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बससेवेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असून, या समस्येवर आगार प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांशी अरेरावी, धक्काबुक्की अथवा धमकीची भाषा वापरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित वॉचमनवर योग्य ती कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या बससेवेच्या प्रश्नांकडे आगार व्यवस्थापनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

“विद्यार्थ्यांशी दादागिरी नको; त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा!” असा इशाराही छात्रभारती विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

न्यूज अकोले App
न्यूज अकोले Mobile App
ताज्या बातम्यांसाठी App डाउनलोड करा
Download App
ADVERT
Left Animation GIF Play Store Badge

NewsAkole App

डाउनलोड करा आणि मिळवा सर्व न्यूज अपडेट्स तुमच्या मोबाईलवर

ADVERT
NewsAkole App Feature Play Store Badge

Order Food Online

आता आपल्या अकोले शहरात देखील FoodOrderKar Food Delivery App Available On Play Store